Songtexte.com Drucklogo

Zenda Songtext
von Dnyaneshwar Meshram

Zenda Songtext

जगन्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो
जगन्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो
आपली मानसं, आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती
(विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती)
(विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती)

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता
(भलताच त्यांचा देव होता)
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता
(दगडात माझा जीव होता)


उजळावा दिवा म्हणूनिया किती मुक्या बिचाऱ्या जळती वाती
वैरी कोन आहे, इथे कोन साथी

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती
(विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती)
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती

बुजगावण्यागत व्यर्थ हे जगनं, उभ्या उभ्या संपून जाई
(उभ्या उभ्या संपून जाई)
खळ रीत रीत माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई
(कुंपन हिथं शेत खाई)

भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी झेंडे एगळे, एगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीती


विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती
(विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती)
(विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती)

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Zenda« gefällt bisher niemandem.